D- TAN FACIAL KIT

Marathi Description

फेशियल किट वापरण्याची पद्धत

तुम्हाला यामध्ये सहा वस्तू देण्यात आलेल्या आहेत आणि त्यासोबत 1 sponge आहे. स्पंज तुम्हाला एका बाउल मध्ये पाणी घेऊन त्यामध्ये बुडवून ठेवायचा आहे म्हणजे तो गोलाकार आकाराने वापरण्यासाठी तयार होईल.

Step 1 : Cleanser – थोडासा घेऊन तुम्हाला संपूर्ण चेहर्याला आणि मानेला व्यवस्थित मसाज करायचा आहे 2 ते 3 मिनिटे…मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला जो sponge दिला आहे त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे.

Step 2 : Scrub – थोडसं घेऊन तुम्हाला संपूर्ण चेहरा आणि मानेला हळुवारपणे वर्तुळाकारात मसाज करायचा आहे. स्क्रब डोळ्यात जाणार नाही याची काळजी घ्यायची आहे. पाच मिनिटे व्यवस्थित मसाज करून झाल्यानंतर तुम्हाला जो sponge दिला आहे त्याने चेहरा व्यवस्थित पुसून घ्यायचा आहे.

Step 3 : Skin Tanning Scrubber – step 2 प्रमाणे वापरायचं आहे या स्क्रबर मुळे चेहऱ्यावर असलेला अतिरिक्त काळपटपणा जातो….

Step 4 : Gold Gel – हे जेल तुम्हाला संपूर्ण चेहऱ्याला आणि मानेला व्यवस्थित लावून मसाज करायचं आहे 5 मिनिटे. आपण जे स्क्रबर वापरले आहे त्यामुळे आपली स्कॅन थोडी soft झालेली आहे या जेल च्या सहाय्याने आपल्याला चेहऱ्यामध्ये अजून softness आणण्यामध्ये मदत करतो… या स्टेप नंतर तुम्हाला चेहरा पुसायचा नाही….

Step 5 : Cream – या क्रीम ने तुम्हाला पूर्ण चेहरा आणि मान 15 मिनिटं व्यवस्थेत मसाज करायचा आहे… मसाज झाल्यानंतर तुम्हाला चेहरा पुसून घ्यायचा आहे…

Step 6 : Clay Face Pack – हा फेस पॅक जर तुमच्याकडे घरी गुलाब पाणी असेल तर त्यामध्ये अथवा साध्या पाण्यामध्ये मिक्स करून पूर्ण चेहरा आणि मान यावर पातळसा थर लावायचा आहे तो पूर्णपणे सुकल्यानंतर तुम्हाला व्यवस्थित रित्या पुसून काढायचा आहे.

टीप : जर तुमच्या घरी ये वाफ घेण्याची मशीन असेल तर step 2 नंतर तुम्हाला 2 ते 3 मिनिटे वाफ घ्यायची आहे… जर नसेल तर नाही घेतली तरी चालणार आहे…

अशाप्रकारे तुम्ही घरच्या घरी अगदी साध्या पद्धतीने फेशियल करू शकता कोणत्याही पार्लरमध्ये जाण्याची अजिबात गरज नाही…